परीक्षेला सामोरे जाताना तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे | Study Tips for SSC/HSC Exam
तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे
SSC व HSC च्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन करणारी , विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तंत्र समजावून देणारी आणि यशस्वी होण्याचे रहस्य सांगणारी प्रयोगशील लेखमाला ...
भाग ०१
परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी
सकारात्मक स्वयंसूचना
व्यायाम/योगा/प्राणायाम/मेडीटेशन
Study Tips
तंत्र अभ्यासाचे क्र. २
परीक्षा पाल्याची आणि काळजी पालकांची
..
पालकांसाठी
1.सर्वप्रथम आपल्या पाल्याची परीक्षा
म्हणजे आपली दिव्य परीक्षाच आहे हा गैरसमज मनातून काढून टाका .
2. मुलाची इतर मुलाशी कधीच तुलना करू
नका .
3. मुलाच्या बौद्धिक क्षमतेचा विचार
करूनच अपेक्षा बाळगा. अवास्तव अपेक्षा बाळगून मुलाचे मानसिक खच्चीकरण करू नका.
4. मुलाच्या
मागे सतत अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून तगादा लावू नका.
त्याच्या कलाने अभ्यास करण्यासाठी प्रेरणा द्या.
5. मार्क म्हणजे
सर्व काही असते हा मनातील भ्रम काढून टाका. मुलाच्या आवडीनुसार आणि कलानुसार
त्याला फक्त संधी द्या.
6... आमच्या वेळी परिस्थिती नसतानाही १०- १० तास अभ्यास करायचो, पाहिला यायचो... वैगरे वैगरे
अशा भुतकालीन गोष्टी मुलांना कधीही सांगू नका .
7. मुलाच्या आहार , विहारावर लक्ष ठेवा. त्याच्या मनावर ताण पडेल असे काही करू नका.
8. विशेषता
मुलांच्या परीक्षेचा त्यांच्या ममीवर जास्त ताण पडतो त्यामुळे अशा ममींना शारीरीक
व मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी परीक्षेची चिंता करू नका. मुलाच्या
कलाने घ्या. त्याच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याला स्वातंत्र द्या. शांत रहा. टोकाची
प्रतिक्रिया व्यक्त करू नका .
9. परीक्षेच्या
कालावधीत मुलांना हवा असतो पालकांचा खंबीर आधार. तो त्यांना द्या.
10. एवढेच
मार्क काढायला हवेत तर तुला अमुक अमुक
साईडला प्रवेश मिळेल अशी भिती दाखवू नका .
11. झालेल्या पेपर बदल मुलाला काहीही विचारू नका .
12. मी काही ठिकाणी पाहिले की पेपरला
केंद्रावर पालकांची जत्रा भरायची .कॉपी करण्यास प्रवृत करणारे बरेच पालक असायचे.
त्यांना आम्ही विनंती करायचो की, मुल त्याच्या
गतीने पेपर देवू देत तुम्ही वाईट मार्गाचा वापर करायला प्रवृत करू नका. परीक्षा केंद्राच्या
आत पालकांनी जावू नये. त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये.
13. मुलाकडे पहाण्याचा एक शक्तिशाली दृष्टिकोन विकसित करा. तुला जरी
अपयश मिळाले तरी दुसरी संधी तुझी वाट बघतेय असा आश्वासक आधार द्या .
१४. तू आळशीच आहे, तुझ्याच्यान काहीच होणार नाही, तुला
डोकंच नाही अशा प्रकारचे शब्दप्रयोग करू नका .
१५. ही परीक्षा म्हणजे जणू काही जीवनाची अंतिम परीक्षा असल्या सारखे
काही पालक रजा घेवून मुलाकडून अभ्यास करवून घेतात. तसे करू नका. त्यामुळे मुलावर
ताण पडतो हे पालकांनी ध्यानात घ्यावे.
१६. मुलाला
समजून घ्या. सर्वात महत्वाचे की मुल महत्वाचे आहे नंतर मार्क. त्या दृष्टीने
पालकांनी चिंता न करता मुलांना आपलेसे करून, विश्वासात
घेवून त्यांच्यात ध्येयासक्ती बाणवा. मुल आपोआपच विकसित होईल.
भाग-2
( पुढील भागात वाचा अभ्यासाचे वाचन वत्राटक तंत्र )