तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र | Best Way to Read Books

 तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र Best way to read books

नमस्कार मित्रांनो तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे या लेखमालेतील मागील ब्लॉग मध्ये आपण परीक्षेपुर्वीची मानसिक तयारीआणि परीक्षा मुलांची आणि काळजी पालकांची. या विषयावर माहिती घेतली. आज आपण अभ्यासाचे वाचन तंत्र Reading Skills व त्राटक तंत्र समजून घेणार आहोत. 

SSC HSC Board परीक्षेला सामोरे जात असताना  वाचन कौशल्य चांगले असेल तर निच्छितच विषय आकलन होण्यास मदत होते.

सर्वसाधारणपणे अभ्यास म्हंटले की वाचनच समोर येते. आपण किती वेळा  वाचतो यापेक्षा कसं वाचतो याला अधिक महत्व असते. कारण एकाग्रता असली आणि तुम्हाला वाचन तंत्र अवगत असले तर तुम्हीच पहिले आला म्हणून समजा.


Reading skills


वाचनाच्या पध्दतीवरून वाचनाचे  दोन प्रकार पडतात.

१. आडवे वाचन best way to read books

यालाच आपण पारंपारीक पध्दती म्हणतो. जे आपण नेहमी अक्षर अन् अक्षर वाचतो, अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्ण विराम आला की थांबतो.परिच्छेद बदलताना थांबतो. डावीकडून सुरू करून उजवीकडे संपवतो, परत मागे येवून परत सुरु करतो ते आडवे वाचन. 

हे वाचन करताना जिथे तुम्ही थांबाल तिथे तुमची एकाग्रता भंग पावते. विचारांची दिशा बदलते. त्यामुळे स्मरणात रहाण्याचे प्रमाण १० % नसते. तुम्ही कितीही रिव्हीजन करा स्मरणात रहातच नाही असा माझा स्वानुभव आहे .

२. उभे वाचन  best way to read books

एका पानावर पण, परंतू,आहे, नाही , , आणि या सारखे कितीतरी शब्द सतत येत रहातात . ते टाळून पानाच्या मध्यभागी लक्ष केंद्रीत करून एकाग्रतेने मधलेच शब्द वाचत वाचत पूर्ण पानाचा अर्थ लावला जातो  त्या वाचनास उभे वाचन म्हणतात.  

उभे वाचन प्रयत्नाने साध्य होते. मधले शब्द वाचून आजूबाजूच्या शब्दांचा अर्थ समजून जलद गतीने वाचण्याची ही पध्दत प्रयत्न साध्य आहे,  अशक्य मात्र नाही. प्रथम प्रथम वृतमानपत्रातील संपादकीय या पध्दतीने वाचणे शिकायला पाहिजे नंतर नंतर कितीही  मोठे पुस्तक वाचू लागलो  की  यामध्ये एकाग्र चित्ताने वाचायचे असलेने आजूबाजूचे संदर्भ आकलन करून घ्यावे लागतात. त्यामुळे आकलन होते शिवाय वाचलेले स्मरणात रहाते.

 वाचन तंत्र आत्मसात करण्याच्या पायऱ्या

  • प्रथम वृतपत्रातील संपादकीय उभे वाचन करून सराव करावा .
  • वाचताना एकाग्रता टिकली पाहिजे तरच बरोबर आकलन होते . हे लक्षात ठेवावे .
  • पाठ्य घटक किंवा संदर्भ पुस्तके यांचे प्रथम आडवे वाचन करावे नंतर उभे वाचन करावे .
  • उभे वाचन एक दिर्घ श्वास घेवून तो श्वास तसाच छातीत ठेवून १५ ते २० सेंकदात करावे . असे केल्याने स्मरणात दिर्घ काळ रहाते.
  • १५ ते २० सेंकदात पान वाचून झाल्यावर डोळे बंद करून ते पान जसेच्या तसे पहायचे .कोठे कोणता शब्द आहे ते दिसेल . त्याची एकदा मेंदूत नोंद झाली की विस्मरण होत नाही .
  • गणित, भूमिती किंवा विज्ञान मधील सुत्रे मात्र आडवे वाचन करुन लक्षात ठेवण्यासाठी डोळे मोठे करून ती पहायची आणि डोळे बंद करून फोटो सारखी मेंदूत क्लीक करायची . कायमची स्मरणात रहातात .
  • आकलन करून एकदा आडवे वाचन झाले की उभे वाचन केल्यावर दिर्घकाळ स्मरणात रहाते.
  • परीक्षा जवळ आलेवर शक्यतो एकाग्रचित्ताने उभे वाचन करावे. म्हणजे एक विषय दोन तासात पूर्ण होतो
  • उभे वाचन करण्यासाठी एकाग्रता खूप चांगली असावी लागते.

टीप- आपल्याला ज्या वाचनाने (आडवे किंवा उभे वाचन) वाचनाचे आकलन व्यवस्थित होते. त्या वाचनाचा अधिक एकाग्रतेने सराव करून वाचन कौशल्य विकसित करावे.

कोरोना संकट मराठी निबंध

त्राटक तंत्र

  • एकाग्रता Concentration वाढवण्यासाठी त्राटक तंत्राचा सराव करावा.
  • त्राटकचा मूळ अर्थ अश्रू असा आहे . डोळ्याची पापणी न लवता, डोळ्यातील अश्रू रोखून  एकटक बिंदूकडे  पहाणे म्हणजे बिंदू त्राटक होय. 
  • तसे बिंदू त्राटक, अग्र त्राटक,   ज्योती त्राटक, शक्ती त्राटक, केंद्र  त्राटक , चंद्र त्राटक आणि सूर्य  त्राटक  असे त्राटकाचे  ७ प्रकार पडतात . 
  • एक एक प्रकार शिकून त्याचा नित्य सराव करून त्याची परीक्षा घेवून पुढील प्रकार शिकायचे असतात. सहा प्रकार शिकून झाल्यावर सातवा  सूर्य त्राटक  हा प्रकार सगळ्यात कठीण असतो . 
  • सूर्य मावळतीला जाण्यापूर्वी १ तास अगोदर पापणी न लवता सूर्यबिंबाकडे पहाणे खूप धोकादायक असते. 

त्राटक हा योग धारणेचा एक भाग असून स्वसंमोहन शास्त्र शिकण्यासाठी प्रथम हे शिकावे लागते. आपली अभ्यासात एकाग्रता टिकावी , स्मरण वाढावे म्हणून आपणास बिंदू त्राटक कसे करायचे ते थोडक्यात सांगणार आहे. प्रथम त्राटक करण्याचे  फायदे पाहू

 

  त्राटक करण्याचे फायदे

  • आपले मन चंचल असते . मनाच्या चंचलतेमुळे, मनाच्या भरकटलेपणामुळे  आपली एकाग्रता होत नाही, त्राटकामुळे मनाची चंचलता पूर्ण थांबून एकाग्रता वाढते .
  • मन एकाग्र करण्याच्या सवयीमुळे आपली श्रवण शक्ती विकसित होते .
  • श्रवण शक्ती विकसित झाली की आकलन निट होते .
  • आकलन निट झाले की अभिरुची वाढते .
  • अभिरूची वाढल्यावर आपोआपच स्मरण वाढते .
  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या ध्येयाप्रत जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होते .
  • दिवसातील केवळ १० मिनीटे त्राटक केल्यास २४ तास अलर्ट रहाण्याची सवय लागते .
  • केवळ मुलांनी अभ्यासाठीच नव्हे तर पालकांनी , थोरा मोठयांनीही मन स्थिर रहाण्यासाठी त्राटक करणे फायदेशिर आहे . .
  • नित्य त्राटक केल्याने डोळे सतेज होतात, डोळ्यांची शक्ती वाढते .

 

 बिंदू त्राटक करण्याची पद्धत

 

आपण जिथे बसणार आहात त्या समोरच्या  भिंतीवर एका कोऱ्या कागदावर २ इंच व्यासाचे वर्तुळ काढून ते काळ्या रंगाने रंगवावे . व ते भिंतीवर आपण बसल्यावर समान रेषेत दिसेल असे  चिकटवावे .

रात्री  पूर्ण विश्रांती घेवून पहाटे लवकर उठावे . प्रातःविधी आटोपून साध्या किंवा पद्यासनात भिंतीवरील काळे वर्तूळ आणि आपले डोळे यात किमान ५ फुटाचे अंतर ठेवून शांत बसावे .

  दिर्घ श्वास घेवून मनातले सगळे वाईट साईट विचार उच्छ्वासा बरोबर काढून टाकावेत .

👁 दिर्घ श्वास घेताना माझे मन एकाग्र होणार आहे अशी सूचना द्यावी .

👁 पापणी न लवता त्या वर्तुळाच्या मध्य बिंदूकडे एकटक पाहत रहा .

👁 प्रथम प्रथम सराव नसलेने डोळ्यातून अश्रू येतील , पापण्यांची उघडझाप होईल तरीही न थांबता जास्तीत जास्त १० मिनीटे बसा.

👁 प्रथम काही दिवस ते वर्तुळ फिरल्याचा भास होईल नंतर नंतर ते वर्तुळ स्थिर होईल . त्यावेळी समजायचे की, आपले मन स्थिर होत आहे .

👁   हे बिंदू त्राटक केवळ मुलांनीच नाही तर पालकांनीही करावे .

आपल्या शारीरिक व मानसिक कुवती नुसार बिंदू त्राटक १ मिनिटापासून कितीही वेळ करू शकता जेथे डोळयांच्या पापण्या लवतिल तेथे त्राटक संपले असे समजावे . चष्मा असेल तर तो काढून बिंदू त्राटक करावे काही अडचण येणार नाही .

👁 दररोज बिंदू त्राटक केल्यावर आपली एकाग्रता वाढीस लागली आहे याचा अनुभव तुम्हाला येईल , तुमचे मन शांत होईल , चंचलता नाहीशी होईल.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now