पॅन कार्ड आधारशी लिंक कसे करायचे ? How to aadhar card link with pan card
आधार कार्ड UIDAI पॅनशी कसे लिंक करायचे? पॅन आधारशी लिंक आहे का? कसे चेक करायचे? याबद्दलची माहिती घेऊया. कलम-234H नुसार जर सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत पॅन आधारशी लिंक केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तेव्हा आजच प्रथम आपले आधार पॅनशी लिंक आहे की , नाही हे तपासून घ्या. पॅन आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्याला आपला पॅन कार्ड व आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. तेव्हा अगदी सहज आपण आपले स्टेटस तपासू शकता.
आधार कार्ड पॅन शी लिंक आहे किंवा नाही हे Pan Aadhar Link Status तपासण्यासाठी खालील स्टेप follow करा.
आधार कार्ड पॅन शी लिंक करा. How to aadhar card link with pan card
- सर्वप्रथम इनकम टॅक्स इंडिया ई-फिलिंग incometaxindiaefiling.gov.in वेबसाइटवर जा. येथे क्लिक करा.
- त्यांनतर Income Tax Website Dashboard च्या डाव्या बाजूला link aadhar या tab वर क्लिक करा.
- आता आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक एंटर करा.
- आधार कार्डमध्ये, जन्माच्या वर्षाचा उल्लेख केल्यावर फक्त चौकोनावर टिक करा.
- सर्व माहिती भरून I Agree चेक बॉक्स ला ओके करा.
- captcha code टाकून लिंक आधार या tab ला submit करा.
- आपला पॅन आधारशी जोडला जाईल.