अध्ययन अक्षम मुलांना समजून घेताना ..what is learning disabilities

बहुअध्ययन शैली (अध्ययन अक्षम) मुलांना समजून घेताना ...मेंदूत सूक्ष्म दोष (अप्रगत मुलाच्या शिकण्यातील अडचण)

what is learning disabilities




एखाद्या विषयात विद्यार्थी मागे राहत असेल, तर त्यामागे अध्ययन अक्षमता हेदेखील कारण असू शकते; मात्र या अक्षमतेचे निदान झाले नाही, तर त्याचा तोटा विद्यार्थ्यालाच होतो. पर्यायाने तो शाळेतील गुणांच्या स्पर्धेत मागे पडतो.  

मुले शाळेला जातात, एखादा विषय त्यांना जमत नाही, तो शाळेतल्या इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना यावा, यासाठी पालक सातत्याने प्रयत्नशील असतात. मग कधी पालक स्वतःच मुलांची पुस्तके हातात घेऊन त्यांना तो विषय त्यांच्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांची रवानगी थेट क्‍लासला करतात... इतके सगळे करूनही परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. मग पालकांची मुलांवर चिडचिड सुरू होते. ""एवढे पैसे खर्च करूनही तुझ्या डोक्‍यात काहीच कसे शिरत नाही,'' असे संवादही सुरू होतात. मुले अशा प्रकारे अभ्यासात मागे का पडतात, याचा विविध देशांमध्ये अभ्यास केला गेला. त्यातून असे लक्षात आले, की अभ्यासात सर्वसाधारण आहेत, असे वाटणाऱ्यांमध्येच 1 टक्के ते 75 टक्के प्रमाण हे अध्ययन अक्षम मुलांचे आहे. यालाच इंग्रजीमध्ये "लर्निंग डिसेबल'(एलडी) असे म्हटले गेले आहे. 



मुल शाळेत 100% ऊपस्थित राहून सुध्दा अप्रगत का राहते.?


समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book

या समस्येवर  उपाय शोधन्याचा प्रयत्न केला असता अशा मुलांच्या मेंदुत सुक्ष्म दोष असल्यामुळे त्याच्या शिकण्यात अडचणी निर्माण होतात.

काही वर्षापुर्वी ग्रहन क्षमता कमी असलेल्या मुलांच्या समस्येला स्पर्श करणारा व ह्रदय हेलावून सोडणारा एक चित्रपट " तारे जमीन पे " आला होता.डिसलेक्सिया (अध्ययन अक्षमता ) असलेल्या मुलांना हाताळतांना शिक्षकांनी (पालकांनी) संवेदनशिलता ठेवली तर त्यांच्या आयुष्याचा कयापालट होऊ शकतो . असा संदेशच जणू या चित्रपटातून देण्यात आला होता.

  प्रत्येक शाळेत अशा मुलांची संख्या काही प्रमाणात राहतेच. त्यातील बहूतांश मुले पाचवी ते आठवी पर्यंत शाळाबाह्य होऊन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. आपण अशा मुलांना नीट हाताळून त्यांना प्रगतीची वाट नक्कीच दाखऊ शकतो. मुळात learning Dificulty (अध्ययन अक्षमता ) हा आजार  डाॅक्टरी ऊपचाराने  बरा होऊ शकेल की नाही हे सांगणे अवघड असले तरी पण अशा मुलातील दोष ओळखून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न केले तर मुल निश्चीतच प्रगत होऊ शकते.

मुलाच्या ग्रहन क्षमतेतील  कमतरतेची विभागणी केल्यास त्याचे पाच ते सहा उप प्रकार पडतात.

1). डिसलेक्सिया  Dyslexia


 मुलांना वाचताना शब्द समजत नाहीत . ही वाचन अक्षमता , शब्दांचे आकलन करून घेण्यासाठी असलेल्या मेंदूच्या केंद्रातील सुसुत्रतेच्या अभावा मुळे होते .  वाचण्यासाठी प्रथम शब्दातील अक्षरावर डोळ्याची नजर जायला हवी. त्यामुळे अक्षर ओळख होते . मग त्या शब्दाची प्रतिमा मेंदूत तयार होते. स्मरणशक्ति केंद्रातील प्रतीमेसी तादात्म्य पाऊन अर्थ समजतो.  मग त्या शब्दाचा उच्चार होतो.स्मरणशक्ती केंद्रातील बिघाडामुळे जन्मतः या पेशींची पुर्णतः वाढ न झाल्याने किंवा पेशीत गुंतागुंत झाल्याने  किंवा पेशिच्या कार्याला  आवश्यक असलेल्या रासायनिक द्रव्यांच्या कमतरतेमुळे डिसलेक्सिया होतो.

2). डिसग्राफिया (लिखाणातील दोष) dysgraphia


 अशी मुले आपल्या मनातील विचार तोंडाने चांगले व्यक्त करु शकतात . परंतू त्याना ते लिहीण्यास अडचणी येतात . त्यांना भाषेची समस्या येत नाही. त्यांच्या लहान स्नायूमध्ये किंवा ते नियंत्रित करणा-या मज्यातंतू मध्ये दोष असतो. त्यांचा लिहीताना वेग खूप कमी असतो. त्यांना एखादा शब्द वाक्य लिहितांना खुप वेळ लागतो . अक्षर खूप खराब येते. गिचमिड करुन लिहीले जाते .3). व्हिज्युअल परसेप्शन (पाहीलेले वापरण्यातला दोष ):-वाचण्यासाठी आणि लिहीण्यासाठी आपण जे पाहतो त्याचा अर्थ समजणे महत्वाचे असते . अशा मुलांत पाहीलेल्या गोष्टीचा अर्थ समजून घेण्याची क्षमता नसते .

3). ऑडीटरी डिसक्रिमिनिशन  


भाषेचा चांगला विकास होण्यासाठी आपण जे ऐकतो ते नीट वापरता यायला हवं. अशा मुलात  मुलात शब्दांचे आवाजातील फरक ओळखण्यात अर्थपुर्ण शब्दात पुन्हा मांडण्यास दोष आढळतो .


5). डिस कॅल्कयुलिया (गणिती अक्षमता)dyscalculia 


या स्थीतीत गणिती प्रक्रियामध्ये  दोष असतात. त्यांना गणिताचा अर्थ समजत नाही. त्यातील संख्या उतरवून घेताना ते चुक करतात . त्यांच्या गणिताच्या स्टेप्स चुकतात. आकडेही ऊलट सुलट लिहीतात.6). डिसग्राफिया :-शरिराच्या हालचाली व लिहीत असताना बोटाच्या हलचाली नियंत्रीत करण्यास मदत करणा-या  स्नायुच्या नियंत्रणास दोष असतो .

7). मेंदुतील ग्रहण क्षमता कमी असण्याची आणखी कारणे


मेंदुमधील काही भागात वाचन , भाषा , दृष्टी , वाच्या , यांच्याशी  निगटीत केंद्रातील पेशीत  सिरोटोनिन या द्रव्याचे प्रमाण कमी होते .    एन-अॅसिटील व अॅस्पार्टेट या द्रव्याचे प्रमाण वाढते . शिवाय मेंदुच्या  त्या केंद्राभोवती  सिराटोनिनचे प्रमाण आवष्यकते पेक्षा अधिक होते. अशा मुलाचा आय क्यू सर्वसाधारण जरी वाटत असला तरी अभ्यासात अशी मुले अप्रगत राहतात.

अध्ययन क्षमता यांच्यात नसल्याने मुले मानसिकदृष्ट्या खचतात . अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. मग ते शाळेत खोड्या करतात ,दंगामस्ती ,खोटं बोलने असे प्रकार करु शकतात .अशा मुलांकडे वर्ग पहिली व दुसरीतच शिक्षकांनी लक्ष द्यावे लागते . या वर्गातील मुलांना त्यांच्या शिक्षकांनी समजू घेतले नाहीतर ही मुले पुढे आपला आत्मविश्वास गमवून बसतात.  या साठी शिक्षकांनी प्रथम त्यांना पुरेसा वेळ देवून त्यांच्यातील दोष समजून घेणे गरजेचे आहे. एकदा का त्या मुलातील  शिकण्यातील अडथळा , दोष समजला तर त्या प्रमाणे ज्ञानरचनावादी साहीत्यातून त्याला प्रगत करणे सोपे जाते.  या साठी शिक्षकांनी पण संयम बाळगायला पाहीजे . कुठेही त्याचा आत्म विश्वास खचता कामानये. दिवशेंदिवस अशा मुलातील आत्मविश्वास वाढत गेला पाहीजे . त्याच्यामध्ये असलेली इतर सुप्तगुणे शोधून त्याला संधी द्यायला पाहीजे . हळू हळू तो मुलगा त्यांच्या सर्व व्यंगावर मात करुन  आत्मविश्वास , जिद्द, शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेली शाबासकी  यांच्या जोरावर नक्कीच प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now