बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) म्हणजे काय? What is intellectual disability?


बौद्धिक अक्षमता  (मतिमंदत्व) म्हणजे काय? 
What is intellectual disability (Mentally retarded)?


inclusive education student


आपल्याला ज्ञातच आहे की, पूर्वी ‘दिव्यांग’ ऐवजी अपंग हा शब्द वापरला जायचा. परंतु अपंग ऐवजी आता 
दिव्यांग उल्लेख करणे आवश्यक आहे. 

“दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६” नुसार 'मतिमंदत्व' ऐवजी 'बौद्धिक अक्षमता' असा उल्लेख केला गेला आहे. हा बदल झाल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये एक सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. मतीमंद असा उल्लेख करणे  हे अपमानास्पद वाटू शकते. त्यामुळे आता बौद्धिक अक्षमता हा बदल झाला आहे.

बौद्धिक अक्षमता ही प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या स्वरुपाची असते. त्याचे प्रमाण देखील वेगवेगळे दिसून येते.
बौद्धिक अक्षमता ही वेगवेगळ्या कारणांमुळे येते. त्यामध्ये जन्मापूर्वीची, जन्मावेळेची ,जन्मानंतरची कारणे यांचा समावेश होतो.




बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) हा रोग किंवा आजार नसून ही एक अवस्था आहे. बौद्धिक अक्षमता व्यक्तीची बौद्धिक वाढ काही कारणांमुळे खुंटलेली असते. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीपेक्षा त्यांची बुद्धी IQ लेव्हल कमी असते. 

बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) कोणाला म्हणावे यासाठी विविध व्याख्या आहेत.

  • बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) कोणाला म्हणावे?



अतिशय सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगायचे तर बौद्धिक अक्षमता (मतीमंद) म्हणजे

“ज्या व्यक्तीच्या शरीराची वाढ झालेली आहे पण मेंदूची वाढ खुंटलेली आहे त्याला बौद्धिक अक्षमता असे म्हणतात.” (सर्वसामान्य बौद्धिक क्षमतेपेक्षा कमी बुद्धिमत्ता IQ)


  • बौद्धिक अक्षमता (मतीमंदत्व) कसे ओळखावे?



  • बौद्धिक अक्षमता असणारी मुले शारीरिक विकासाच्या अवस्थांमध्ये त्यांच्या वयाच्या सर्वसामान्य मुलापेक्षा मागे पडतात.
  • उदा. ज्या वयात सर्वसाधारण मुल बसणे, उभे राहणे, चालणे, बोलणे इत्यादी शारीरिक विकास दाखवते त्या वयात ही मुले हा विकास दाखवत नाहीत.
  • साधारणपणे मुल एक वर्षाचे झाले की उभे राहू शकते चालू शकते. मात्र काही बौद्धिक अक्षमता असणारी मुले वर्षाची झाली तरी बसू शकत नाहीत. उभी राहू शकत नाही त्यांना या शारीरिक हालचाली करता येण्यासाठी दोन तीन किंवा अधिक वर्षे लागतात.
  • सौम्य प्रमाणात बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा शारीरिक विकास बऱ्याच वेळा सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असतो.
  •  मध्यम बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांचा शारीरिक विकास बाल्यावस्थेत सर्वसामान्यांच्या तुलनेत कमी असतो परंतु त्यांच्यात काहीही शारीरिक दोष नसेल तर सौम्य व मध्यम मतिमंदत्व बौद्धिक क्षमता जाणवतही नाही त्यामुळे हि मुले शाळेत जाईपर्यंत त्यांचे बौद्धिक अक्षमता (दिव्यांगत्व) लक्षातही येत नाही.
  • शिकण्यासाठी या मुलांना इतरांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो शाळेत जेव्हा ही मुले इतरांच्या तुलनेत मागे पडतात तेव्हा त्यांची (मतिमंदत्व) बौद्धिक अक्षमता लक्षात येते.


पडताळा सूची 



1.  तोंडी प्रतिसाद योग्य रीतीने न देणे.

2.  एकाग्रता नसणे.

3.  नवीन गोष्ट शिकताना फार त्रास होणे.

4.   शिकविलेल्या पाठाचे आकलन न होणे.

5.  स्वतःच्या गरजा व्यक्त करता न येणे.

6.  फळे भाज्या झाडे यांची प्रत्येकी पाच नावे सुद्धा न सांगता येणे.

7.  साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी वारंवार सांगायला लागणे.

8.  दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःमध्ये मग्न असणे.

9.  बरोबरीच्या मुलांशी न पटणे.

10. मित्रांसोबत क्रिकेट चेंडू किंवा विठू दांडू खेळताना न येणे. खेळाचे नियम न समजणे.

11.  मुलाला पेन्सिल किंवा कात्री नीट न धरता येणे.

12. अमूर्त विचार शक्तीचा अभाव असणे.

13. कोणतीही गोष्ट समजण्यास इतरांपेक्षा विलंब लागणे.

14. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यास फार वेळ लागणे.

15. लेखन, वाचन, अंकगणितात प्रगती न होणे.

16.  शिकताना मूर्त/प्रत्यक्ष  दिसणाऱ्या गोष्टीवर सतत अवलंबून असणे.

17.  प्रथमपुरुषी न बोलणे. (मी,आम्ही,आपण या सर्वनामांचा वापर न करणे.


वरील पैकी कोणत्याही ४ ते ५ गोष्टी साठी मुलांचा प्रतिसाद मिळत नसेल तर अशा वेळी Psychologist मानसोपचार तज्ञांकडे  जाऊन मुलांचा IQ बुध्यांक तपासणी करून घेणे आवश्यक असते.

लोकसंखेच्या १.५% म्हणजे १०० लोकांपैकी एक व्यक्ती किंवा दीड व्यक्ती याप्रमाणे बौद्धिक अक्षमतेचे प्रमाण आहे. महिलांपेक्षा पुरुषामध्ये बौद्धिक अक्षमतेचे प्रमाण जास्त आहे.

बौद्धिक अक्षमतेबद्दल (मतिमंदत्व) विषयी सर्वसामान्यपणे त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याचे दिसून येते. समाजात अशी समजूत झालेली आहे की बौद्धिक अक्षमता असणारी मुले काहीच करू शकत नाही ही मुले वेडी असतात. असे बिलकुल नसून बहुतेक जण स्वावलंबी होतात. आणि आपली कामे पूर्ण करतात. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण , प्रोत्साहन , मार्गदर्शनाची आवश्यकता असते. 

सर्वसामान्यांच्या तुलनेत प्रगती कमी होईल मात्र थोडा अधिकचा वेळ देवून त्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यानुसार नियमित सराव आणि सातत्य ठेवले तर नक्कीच बौद्धिक अक्षमता असणारी व्यक्ती स्वावलंबी होते. हे त्यांच्या बुध्यांक IQ लेव्हल नुसार कमी अधिक प्रगती अवलंबून असते. 

मात्र सर्वाना एकसमान पातळीवर न बघता त्यांच्या बुध्यांक चा विचार करून सराव देणे गरजेचे आहे.


तुम्हाला ‘थॉमस अल्व्हा एडिसन’ यांच्या बद्दल माहिती असेलच त्यांच्या शिक्षकांनी गतिमंद आहे म्हणून तू काहीच शिकू शकणार नाही म्हणून शाळेतून काढून टाकले असा शिक्का त्याच्यावर मारला गेला. परंतु तरीदेखील त्याने आईच्या मदतीने शिकून साऱ्या जगाला दिवेचा दिवा शोध लावला.


प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे कलागुण लपलेले असतात. त्याचा शोध घेऊन तसे प्रशिक्षण देणे आवश्यक असते. त्यामध्ये बौद्धिक अक्षमता मुलांच्या मध्ये सुद्धा असणाऱ्या कलागुणांना वाव देवून आपण त्यांना स्वावलंबी बनवू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या बौद्धिक अक्षमतेचे बुध्यांक IQ नुसार केलेले वर्गीकरण


बौद्धिक अक्षमतेचे (मतिमंदत्वचे) वर्गीकरण


  1.  सौम्य बौद्धिक अक्षमता
  2.  मध्यम बौद्धिक अक्षमता
  3.  तीव्र बौद्धिक अक्षमता
  4.  अतितीव्र बौद्धिक अक्षमता

यामध्ये IQ नुसार हे स्तर आहेत.

१. सामान्य बुध्यांक (Normal) – IQ ९० ते ११०

२. (Bordreline बौद्धिक अक्षमता – IQ ७१ ते ८९ )

३. सौम्य बौद्धिक अक्षमता  (Mild) - IQ ५० ते ७०

४. मध्यम बौद्धिक अक्षमता (Moderate) – IQ ३५ ते ४९

५. तीव्र बौद्धिक अक्षमता (Severe) – IQ २० ते ३४

६. अतितीव्र बौद्धिक अक्षमता (Profound) – IQ २० पेक्षा कमी

योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास मुलांचा विकास होण्यास लवकर मदत होते. बौद्धिक अक्षमता बालकांचे निदान मनसोपचार तज्ञ psychologist यांच्याद्वारे केले जाते. त्यानुसार आपल्याला आपल्या पाल्याची बुध्यांक IQ लेव्हल नुसार पद्धतीने शिकवायचे? काय शिकवायचे? यासाठी सपोर्ट कसा द्यायचा ? वाचा उपचार थेरेपी आवश्यकता आहे का? असे योग्य समुपदेशन केले जाते आणि त्यानुसार मिळेल त्याठिकाणी संधी उपलब्ध करून मुलांचे कौशल्य विकसित करण्यास मदत होते.


लवकरात लवकर निदान व उपचार होण्यासाठी पालकांनी अजिबात भीती, किंवा समाजातील अपमानास्पद भावना याबद्दल कसलीही भीती न बाळगता मुलांचे लवकरात लवकर निदान व उपचार करून घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील घटक सुद्धा आपल्या मदतीला येऊ शकतो. त्यामुळे नकारात्मक भावना मनात न ठेवता लवकर निदान करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले पाहिजे, त्यामुळे शिक्षणाबरोबर, दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. जेणेकरून ती व्यक्ती स्वावलंबी बनु शकेल. आणि एक आदर्शवादी आनंदी जीवन जगू शकेल.   

➡️ बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) येण्याची कारणे
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now