बौद्धिक अक्षमता (मतिमंद) बालकांचे दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य Activities of daily living Skills (ADL Skills)
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला वैयक्तिक काळजी घेणे,नीटनेटकेपणा,आरोग्याची काळजी घेणे, जेवण तयार करणे, व्यवहार करणे , समाजात वावरणे इ गोष्टी करणे आवश्यक असते. यालाच 'दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य' म्हणून ओळखले जाते. ही जीवनावश्यक कौशल्य आपण अनुकरणातून प्रत्यक्ष कृती तुन शिकतो. मात्र बौद्धिक अक्षमता मतिमंद असणाऱ्या मुलांना या गोष्टी करण्यासाठी आपल्या मदतीची , मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्याचा नियमित सराव घेऊन 'दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य; विकसित करावे लागतात.
बौद्धिक अक्षमता असणाऱ्या बालकांना ADL SKILLS
दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य विकसित करताना आव्हाने येतात. यावेळी त्यांना मदतीची
आवश्यकता असते. दैनदिन जीवनाचे कार्य सुरळीतपणे होणे हे सर्वांसाठी आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे बौद्धिक अक्षमता असणारे बालक/व्यक्ती यांना देखील स्वतः ची कामे
स्वतः करता आली पाहिजे ही प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. यासाठी मुलांचे दैनंदिन जीवनवश्यक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले
स्वावलंबी होण्यास मदत होईल.
दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य कोणती?
खाली दिलेल्या जीवनावश्यक कौशल्या व्यतिरिक्त
देखील दैनंदिन जीवनात आवश्यक आणि महत्वाचे कौशल्य असू शकतील. हे त्या भागातील,
कुटुंबातील परिस्थितीनुसार बदल किंवा अधिकचे कौशल्य असतील त्यामुळे खालील दिलेल्या
लिस्ट मध्ये आपणास आपल्या परीस्थितीनुसार त्यात फेरबदल करता येईल. मुलांच्या गरजेनुसार आवश्यक ते कौशल्य निवडावे.
बौद्धिक अक्षमता बालकांना स्वावलंबी बनवण्यासाठी
तसे धडे, कृतीतून, आधाराने/मदतीने प्रशिक्षण देता येऊ शकते. हा बदल होण्यासाठी या
मुलांच्या बाबतीत संयम ठेवणे गरजेचे आहे.
त्यासाठी मुलांना प्रोत्साहन देवून
शिकवणे आवश्यक आहे. या लॉकडाऊन च्या काळात शाळा बंद आहे आणि आपले मुल आपल्या
सहवासात जास्त वेळ आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या मुलांचे दैनंदिन
जीवनावश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकता. जेणेकरून मुले स्वावलंबी
होण्यास मदत होईल.
यासाठी आपल्याला यापूर्वी काही प्रमाणात मार्गदर्शन मिळले असेलच
त्यापद्धतीने आपण मुलांचा जास्तीत जास्त सराव घ्यावा. जितका जास्त सराव आणि सातत्य
तेवढे लवकर यश मिळेल अशी अपेक्षा आपण करूया आणि मुलांना स्वावलंबी होण्यास मदत
करूया. चला तर बघूया दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य ADL Skills
दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य
१. वैयक्तिक स्वच्छता व स्वतः ची काळजी घेणे
- दात घासणे
- स्वच्छ हात धुणे
- अंघोळ करणे
- अंग कोरडे करणे/पुसणे
- बाहेर जाण्याकरिता स्वतः तयार होणे
- केसाची निगा राखणे
- कपडे घालणे
- शर्टची बटण लावणे
- शौचालयाचा स्वतंत्रपणे उपयोग करणे
- हातपाय साबण लावून स्वच्छ धुणे
- चेहरा साबण लावून स्वतः धुणे
- कपड्यांच्या घड्या घालणे
- व्यायाम करणे
- जेवताना न सांडता पूर्ण जेवण करणे
- व्यायाम करणे
- व्यवहार पैश्यांची ओळख
२. घरकाम -
- घर झाडून काढणे
- जेवणानंतर ताट, प्लेट, वाट्या घासणे
- स्वयंपाकातील छोटे छोटे पदार्थ बनवला शिकवणे
- चहा कॉफी सरबत बनवणे
- भाज्या निवडणे
- कपडे धुणे
- वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे
- घरघुती फोन call उचलणे
- वयोवृद्धांची सेवा करणे
- घरातील केर काढणे
- वस्तू नीटनेटक्या लावणे
- बादली मध्ये नळातून पाणी भरणे
- स्वयंपाक घरातील धुतलेली भांडी लावणे
- जेवणाची तयारी करणे
- स्वतःचे अंथरून टाकणे
- चादराची घडी घालणे
- झाडांना पाणी घालणे
३. सामाजिक
- बाजारातील अत्यावश्यक कामे- किराणा माल विकत आणणे.
- व्यवहार शिकवणे
- भाजीपाला घेऊन येणे
- डॉक्टरकडे स्वतः जाणे
- वेळच्या वेळी औषधी घेणे
- घरी किंवा शाळेत शिक्षकांना किंवा मोठ्यांना अभिवादन करणे.
४. शैक्षणिक
- गणितातील बेरीज
- वजाबाकी
- गुणाकार
- भागाकार इ. क्रिया शिकवणे.
- संख्याज्ञान
- व्यवहार ज्ञान
- वाचन , लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी नियमित सराव करून घेणे.
उपरोक्त दिलेल्या कौशल्य व्यतिरिक्त किंवा लागू नाही असे कौशल्य उदा. वेणी घालणे , दाढी बनवणे स्री/पुरुष असे बदल किंवा आपल्याला आवश्यक वाटत असेल असे कौशल्य आपण निच्छित करू शकता.
सर्वप्रथम मी माझ्या
मुलाला आवश्यक दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य शिकवणार आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न
करणार जेणेकरून माझा पाल्य स्वतःचे कामे स्वतः करू शकेल. यासाठी माझ्या मनात
कसलीही शंका , भीती नाही. यासाठी आवश्यक वाटेल तेव्हा योग्य तज्ञांचे मार्गदर्शन
घेईल . माझा पाल्य काहीच करू शकणार नाही. अश्या नकारात्मक विचारापासून मी दूर
राहील. आणि माझ्या पाल्याचे जीवनमान कसे उंचावू शकेल त्यासाठी त्याला कोणत्या
गोष्टी शिकवायच्या आहेत ते जाणून घेईन आणि त्या दिशेने प्रयत्न करेल. असे आपण मनात
निश्चय करूया.
दैनंदिन कौशल्य शिकवण्याचे काही टिप्स / पद्धती
- माझ्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला कोणते दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य शिकवायचे आहेत? त्याची एक यादी बनवा.
- यादीनुसार आपण जे कौशल्य शिकवणार आहात त्याचे एक वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.
- वेळापत्रकानुसार त्या त्या वेळेत ते कौशल्य शिकवले जाईल याचे नियोजन करा.
- उदा. सकाळी दात घासणे, जेवण बनवणे हे जेवण बनवायच्या वेळेत हे कौशल्य शिकवता येईल, झोपताना अंथरून टाकणे इ. याप्रमाणे त्या त्या वेळेतील कौशल्य त्या वेळेत शिकवता येईल असे नियोजन केल्यास मुलांना तसेच आपल्याला ते कंटाळवाणे किंवा वेगळेपण वाटणार नाही आणि आपला वेळ देखील वाचेल त्यासोबत आपले काम देखील पूर्ण होईल.
- जे कौशल्य शिकवणार आहात ते पहिल्याच दिवशी पासून सुरुवात न करता त्या कौशल्याचे निरीक्षण मुलांना करायला सांगा.
- गरजेनुसार मुलांना संबंधित कौशल्य शिकवताना छोटे छोटे भाग पाडून तशी कृती करून घ्या.
उदा. शर्ट परिधान करणे.
·
शर्ट घालणे शिकवण्यासाठी
सुरुवातीला आपण मुलांना टी-शर्ट पासून सुरुवात केल्यास अधिक चांगले होईल.
टी-शर्ट
प्रथम आपण डोक्यातून गळ्यापर्यंत नेऊन बाहू मध्ये हात टाकून आधार देत-देत सूचना
देणे आणि मग मुलांना टी-शर्ट खाली ओढायला सांगणे.
असे केल्याने मुलांचा आत्मविश्वास
वाढतो. त्याने टी शर्ट खाली ओढल्यामुळे असे वाटेल की मी स्वतः टी शर्ट घातला. शिकत
असताना मुलांना याप्रमाणे आनंद देखील मिळेल त्यानंतर आरश्यासमोर जाऊन प्रतिमा
आरश्यात दाखवावी जेणेकरून मुलांना स्वतः बद्दलचा आत्मविश्वास वाढेल , व पुढच्या
वेळी स्वतःहून प्रयत्न करू शकेल.
याठिकाणी आपल्याला
पहिल्या स्टेप पासून सुरु न करता कोणत्या गोष्टी मुलांसाठी सोप्या असू शकतील
ज्याने मुलांना आनंद मिळू शकेल. त्या कृती प्रथम मुलांकडून करून घेणे. म्हणजे आपण
मुलांना टी शर्ट घालायला शिकवताना टी-शर्ट ची ओळख करून देण्यापासून सुरुवात न करता
डायरेक्ट टी-शर्ट खाली ओढायला शिकवले त्यामुळे मुलांना ही कृती अगदी सहज वाटू शकेल
आणि मी टी-शर्ट घातला हा आत्मविश्वास ,मिळाला. याप्रमाणे कृती करून घ्यावी.
- बौद्धिक अक्षमता मुलांना शिकताना सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक वेळ व वारंवार सूचना आवश्यक असतात.
- एखादी कृती करण्यासाठी मुलाला जमत नसेल किंवा वारंवार सांगून पण ती कृती करत नसेल तर अशा वेळी मुलाला रागवू नका. अशा वेळी संयम ठेवणे फार महत्वाचे आहे.
- एक कौशल्य एका दिवसात शिकवले म्हणजे तो शिकेल हे गृहीत धरू नये त्यासाठी नियमित कृती, संधी, सराव आणि सातत्य आवश्यक आहे.
उदा. सध्या आपण लॉकडाऊन सुरु झाल्यापसून वारंवार हात धुणे , तोंडाला मास्क लावणे ह्या क्रिया करतो ज्या सुरुवातीला आपल्याला कंटाळवाण्या वाटत होत्या मात्र आता त्याची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे नवीन विशेष काही वाटत नाही.
- अगदी त्याच प्रमाणे मुलांना सुद्धा कौशल्य शिकवताना ती सवय लागण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. आपण नियमितपणे सराव सुरु ठेवावा.
- याकामासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग करून घेता येऊ शकेल. उदा. स्वयंपाक करताना आई च्या मदतीने शिकणे, व्यवहार ज्ञान, बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, वाचन , लेखन इ. गोष्टी भावंडांच्या मदतीने शिकू शकतील. परीस्थितीनुसार कामाचे वाटप करून मुलाला संबंधित कौशल्य शिकवता येऊ शकेल.
- शिकवण्यास मदत होण्यासाठी आपण on call द्वारे डॉक्टरांशी , मानसपोचार तज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
- सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध open सोर्स चा उपयोग करता येऊ शकेल उदा. youtube , google search इ. लॉक डाऊन काळातील शिक्षण Learning Frome Home
- मुलाचे अध्ययन चांगले घडण्यासाठी पूर्वज्ञानाशी सांगड घालून संबंधित कौशल्य शिकवावे.
- मुलांना प्रोत्साहन , प्रेरणा द्या जसे शाब्बास , छान , अरे व्वा! असे मुलाचे मनोबल वाढेल असे शब्दप्रयोग करा.
- मुलांना बक्षीस द्या एखादी कृती छान प्रकारे केल्यानंतर मुलांच्या आवडीचे बक्षीस जरूर द्या. उदा.चॉकलेट
- आपल्या संपर्कातील बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांच्या पालकांशी on call चर्चा करा.
“The Pessimist Sees Difficulty In Every Opportunity. The Optimist Sees Opportunity In Every Difficulty.” – Winston Churchill
याप्रमाणे आपण
आवश्यकतेनुसार बदल करून मुलांचे दैनंदिन जीवनावश्यक कौशल्य विकसित करू शकतो यासाठी
आपल्याला संयमी राहून आशावादी रहायला हवं. नक्कीच आपल्या या
प्रयत्नांचे यश मिळेल. या लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा योग्य सदुपयोग आपण करून घेऊया
आणि मुलांना स्वावलंबी बनवूया.