विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका अनुकूलन Question paper adaptation for special needs (disabled child) students
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
शैक्षणिक
प्रगती चाचणी
पायाभूत चाचणी : २०१८-१९
विशेष गरजा असणाऱ्या (cwsn) विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन परीक्षेमध्ये काही सोयी- सवलती देऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत आणणे यासाठी मार्गदर्शक नमुना प्रश्न अनुकूलन
संदर्भ- 1) शासन
निर्णय १६ ऑक्टोबर २०१८
2) १५ फेब्रुवारी २०१६
3) ११ जानेवारी २०१७
प्रत्येक मुल पंचज्ञानेद्रीये मार्फत ज्ञान ग्रहण करत असते. प्रत्येक
मुलाची आवड,गरज वेगवेगळी आहे. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना ऐकून चांगले समजते.तर काहींना दृश्यातून चांगले स्मरणात राहते. काही कृतीतून चांगले शिकतात. त्यामुळे
मुलांची आवड, अभिरुची , गरज लक्षात घेवून
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया मनोरंजक करणे आवश्यक असते.
यासाठी विद्यार्थ्यांच्या
शिकण्यासाठी अध्ययनार्थी दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.जसे- श्रवण अध्ययन शैली अध्ययनार्थी , दृष्टी अध्ययन
शैली अध्ययनार्थी, स्पर्श अध्ययन शैली अध्ययनार्थी आणि बहु अध्ययन (पंचज्ञानेद्रीये)
शैली अध्ययनार्थी विशेष गरजा असणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या मध्ये काही पंचज्ञानेद्रीये अक्षम असतात. अशावेळी उर्वरित ज्ञानेद्रियांमार्फत विद्यार्थी
ज्ञान ग्रहण करून शिकत असतात. प्रत्येक मुलांना शिक्षण देणे हे बालकाचा मोफत
व सक्तीचे शिक्षण (RTE Act २००९,
Rpwd Act २०१६) या कायद्याने प्रत्येक मुलाला शिक्षण
घेण्याचा मुलभूत हक्क मिळाला आहे. पायाभूत चाचणी प्रश्न पत्रिकेतील अनुकूलन करण्यासाठी प्रथमतः
अध्ययनार्थी दृष्टीकोन ज्ञात असणे आवश्यक आहे.
विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय दृष्टीकोनाकडुन शैक्षणिक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी खालील तक्त्याचे अवलोकन करावे.
अ.क्र.
|
वैद्यकीय
दृष्टीकोन
|
अध्ययनार्थी
दृर्ष्टीकोन
|
१
|
अंध
|
श्रवण व स्पर्श अध्ययन शैली अध्ययनार्थी
|
२
|
कर्णबधीर
|
दृष्टी अध्ययन शैली अध्ययनार्थी
|
३
|
बोधात्मक अक्षम (मतीमंद), बहुविकलांग, स्वमग्न,
|
बहुअध्ययन शैली क्रमांक १ जसे- श्रवण, दृष्टी, स्पर्श शैली
अध्ययनार्थी पंचज्ञानेद्रीयामार्फत ज्ञान ग्रहण करतात. मात्र यांची शिकण्याची
गती ही कमी असते. म्हणून इथे यामुलांसाठी मूल्यमापन बाबत थोडासा वेगळा विचार
करणे गरजेचे आहे. यासाठी खालील उदा. द्वारे सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध आहे.
|
४
|
अंशत: अंध,
अध्ययन अक्षम, वाचादोष, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, इतर उर्वरित सर्व
|
बहुअध्ययन शैली क्रमांक २ जसे- श्रवण, दृष्टी, स्पर्श शैली
अध्ययनार्थी थोडक्यात सांगायचे तर असे सर्व अध्ययनार्थी जे पंचज्ञानेद्रीयामार्फत
ज्ञान ग्रहण करतात.
|
उपरोक्त अध्ययनार्थी दृष्टीकोनातून प्रश्न पत्रिकेतील करावयाचे विद्यार्थ्यांच्या
गरजेनुरूप अनुकूलन यासाठी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ ली ते
१२ वी च्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबत शासन निर्णय दिनांक१६ ऑक्टोबर २०१८ इयत्ता १ ली ते ९
वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवर सुविधा देताना संबंधित पालक,शिक्षक यांच्याशी चर्चा करून
विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप मुख्याद्यापकांनी सवलती देण्याचा निर्णय घ्यावा. यासाठी विद्यार्थ्यांच्या
मूल्यमापन व परीक्षेविषयी गटसाधन केंद्रातील (BRC) समावेशित शिक्षण विशेषतज्ञ व रिसोर्स टिचर यांचे मार्गदर्शन
घ्यावे. विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक प्रगतीस पूरक ठरणाऱ्या सवलती देणे बंधनकारक आहे.
सोयी-सवलती देण्यामागील मुख्य उद्देश-
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा पद्धतीमध्ये काही सोयी-सवलती देऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत आणणे हा सोयी-सवलती देण्यामागील मुख्य उद्देश आहे.
शासन निर्णय – १५ फेब्रुवारी २०१६ व ११ जानेवारी २०१७ असे अध्ययनार्थी ज्यांना लेखन
करताना अडचणी येतात जसे-अंध,अंशत:अंध, अस्थिव्यंग(हाताने अक्षम), बहुविकलांग,
स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, मतीमंद व अध्ययन अक्षम अशा विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचकनीस देणेबाबत सूचना सदर शासन निर्णयामध्ये नमूद
करण्यात आल्या आहे.
उपरोक्त अध्ययनार्थी
दृष्टीकोन ठेऊन विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन व परीक्षा बाबत सोयी सवलती देण्यात याव्यात.पायाभूत
चाचणी २०१८-१९ प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप अनुकूलन करावयाचे आहे.
उपरोक्त तक्त्यातील वैद्यकीय
दृष्टीकोनातून अध्ययनार्थी
कोणत्या शैलीने शिकतो त्यानुसार विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन वर्गशिक्षकांनी अनुकूलन करावे.
विशेष नोंद-
खालील प्रश्न हे नमुना प्रश्न आहेत. प्रत्येक मुलाची गरज वेगळी आहे. ते ओळखून आवश्यकतेनुसार
शासन निर्णयाचा आधार घेऊन अनुकूलन करावे. यासाठी काही नमुना प्रश्न खालील प्रमाणे
·
श्रवण शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी अनुकूलन –
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास चित्राचे वर्णन करायला सांगणे किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल.
- वरील प्रश्न लक्षात घेता चित्राचे वर्णन करताना एकुण चार खेळाडूचे चित्रे आहेत. त्यामध्ये पहिल्या खेळाडूच्या समोर दोनावर तीन अशी संख्या आहे. (इथे संख्येचा उल्लेख करू नये कारण उल्लेख केल्यास अप्रत्यक्षपणे उत्तर सांगतोय असा होईल) त्यामुळे दोनावर तीन असे सांगावे , संबंधित विद्यार्थी ऐकून तेवीस असा अर्थ लावेल आणि त्यानंतर तीचे नाव सई आहे.
- अशा पद्धतीने चारही चित्राचे वर्णन करावे. शेवटी विचारावे की ३२ क्रमांक हे कोणत्या खेळाडूचे नाव होते. विद्यार्थी परी असे सांगेल ते लेखनिक उत्तर ऐकून लिहेन.
· दृश्य अध्ययन शैली अध्ययनार्थी –
- वरील प्रश्नाचा विचार करता आहे. विद्यार्थी स्वतः चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर लिहेन. कारण सर्व दृश्य स्वरुपात उपलब्ध आहे.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन दिलेला प्रश्न स्वरूप तेच ठेऊन विद्यार्थ्याच्या गरजेनुरूप काठीण्यपातळी कमी
करण्यात यावी.
उदा. वरील प्रश्नामध्ये ३२ क्रमांक खेळाडूचे नाव
विचारले आहे. याठिकाणी संख्याज्ञान स्तर कमी करून जसे- ५,७,८,१५,२० याप्रमाणे
विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन अनुकूलन करावे, याप्रमाणे स्तर कमी करून
विद्यार्थ्याकडून विचारलेला अंक ओळखून घेणे. व त्याखालील नाव पाहून लिहायला सांगणे
किंवा लेखनिक च्या मदतीने उत्तर लिहणे अपेक्षित आहे.
किंवा
विचारलेल्या क्रमांकानुसार चित्रातील
खेळाडूच्या नावाला विद्यार्थी गोल करेन. अशा पद्धतीने वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्याची गरज व क्षमता लक्षात
घेऊन प्रश्न पत्रिकेचे स्वरूप
न बदलता अनुकूलन करायचे आहे. यासाठी शासन निर्णय १६ ऑक्टोंबर २०१८ चे वाचन
करावे.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही.मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा.
h
श्रवण
शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी अनुकूलन –
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास चित्राचे वर्णन करायला सांगणे किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल. विद्यार्थ्यास प्रश्न वाचून दाखवावा.
- त्यानंतर चित्राचे वर्णन करताना एकुण चार वस्तूची चित्रे आहेत. त्यामध्ये पहिल्या चित्रावर एकावर शून्य अशी संख्या आहे. (इथे संख्येचा उल्लेख करू नये कारण उल्लेख केल्यास अप्रत्यक्षपणे उत्तर सांगतोय असा होईल) त्यामुळे एकावर शून्य असे सांगावे , संबंधित विद्यार्थी ऐकून दहा रुपये असा अर्थ लावेल अशा पद्धतीने चारही चित्राचे वर्णन करावे. शेवटी विचारावे कपाची किंमत किती रुपये आहे. विद्यार्थी २५ रुपये सांगेल. त्याठिकाणी अक्षरी किंमत बहुपर्याय द्यावा जेणेकरून लेखनिक संबधित विद्यार्थ्यास ऐकवेल व कपाची अक्षरी किंमत लेखनीकास लिहायला सांगेल व लेखनिक उत्तर लिहेन.
· दृश्यअध्ययन शैली अध्ययनार्थी –
- वरील प्रश्नाचा विचार करता आहे त्याच पद्धतीने विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर प्रश्न वाचून निरीक्षण करून सोडवेल.कारण सर्व दृश्य स्वरुपात उपलब्ध आहे. आवश्यकता वाटल्यास चित्रातील किंमती (दहा रुपये, वीस रुपये, पंचवीस रुपये,अठरा रुपये) याप्रमाणे पर्याय देण्यात यावा. यापैकी बरोबर अक्षरी किंमत शोधून उत्तर लिहेन.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन दिलेला प्रश्न स्वरूप तेच ठेऊन काठीण्यपातळी विद्यार्थ्याच्या गरजेनुरूप कमी करण्यात यावी.
उदा. वरील प्रश्नामध्ये चित्रातील
किंमती बदल करणे. तसेच अक्षरातील किंमती
बहुपर्याय तिथे नोंदवावा. विद्यार्थ्याकडून चित्रातील कप व कपाची किंमत ओळखून घ्यावी. व पर्यायातील
बरोबर उत्तराला गोल करायला
सांगावे.
किंवा लेखनिक च्या मदतीने उत्तर लिहणे अपेक्षित आहे.
अशा पद्धतीने वर्गशिक्षकांनी
विद्यार्थ्याची गरज व क्षमता लक्षात घेऊन प्रश्न पत्रिकेचे स्वरूप न बदलता अनुकूलन करायचे आहे. यासाठी शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ वाचन करावे.
बहुअध्ययन
शैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा.
श्रवण
शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी
अनुकूलन
–
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास प्रश्न वाचून दाखवावा किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल.
दिलेले अक्षरे ऐकवावे.
त्यानुसार विद्यार्थी अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द
सांगेल
व लेखनिक उत्तर पत्रिकेत उत्तर लिहेन.
· दृश्य अध्ययन शैली अध्ययनार्थी –
- विद्यार्थी स्वतः अक्षरांचे निरीक्षण करून अर्थपूर्ण शब्द बनवेल.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन दिलेल्या अक्षरापासून तयार केलेले अर्थपूर्ण शब्द व याव्यतिरिक्त अर्थपूर्ण शब्द यांचा बहुपर्याय देण्यात यावा. उदा. हात,हार,पान,डोळे,कान याप्रमाणे विद्यार्थ्याकडून दिलेले अक्षर व तयार होणारे शब्द ओळखून घ्यावे. किंवा शब्दाचे चीत्रकार्ड च्या सहाय्याने शब्द ओळखून घ्यावे. व शब्द पाहून लिही सांगावे. लेखनिक असेल तर त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याने दिलेले उत्तर लेखनिक लिहेन.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा.
श्रवण
शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी
अनुकूलन
–
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास प्रश्न वाचून दाखवावा किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल.
- दिलेल्या चित्राचे वर्णन करणे. चित्रात मुलगा, कुंडीतील झाडे आहेत. मुलाच्या हातात पाण्याची बकेट आहे. तर मुलगा या चित्रात काय करत असेल ? असे विद्यार्थ्याकडून चित्रातील कृती ओळखून घ्यावी व बहुपर्याय देवून लेखनिक वाचन करून दाखवेल विद्यार्थी ऐकून उत्तर सांगेल व लेखनिक उत्तर लिहेन.
· दृश्य अध्ययन शैली अध्ययनार्थी –
- विद्यार्थी स्वतः चित्राचे निरीक्षण करून चित्रातील कृती लिहेन. किंवा नमुन्यासाठी एका चित्रातील कृती सह नमुना दाखवण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यास प्रश्न समजण्यास सोयीचे होईल.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून चित्रातील वस्तू,व्यक्ती ओळखून घेणे. कोणते कार्य,कृती होत आहे हे विद्यार्थ्याकडून ओळखून घेणे यासाठी स्वतः वर्गशिक्षक किंवा लेखनिक मदत करेल. कृती पूर्ण वाक्यात न लिहता काही चित्रातील शब्द जरी लिहले तरी पुरेसे समजण्यात यावे व गुण देण्यात यावे. किंवा पर्याय देऊन गोल करायला सांगणे.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा.
·
श्रवण
शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी अनुकूलन –
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास प्रश्न वाचून दाखवावा किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल.
- दिलेले बहुपर्यायाचे वर्णन करणे. (ऐकवणे) उदा. पहिल्या पर्यायामध्ये ३० + ६ आहे म्हणजे किती झाले. ३६ याची नोंद लेखनिक ठेवेन त्यानंतर ६ दशक व ३ एकक म्हणजे किती ? ६३ नोंद लेखनिक ठेवेन अशा पद्धतीने सर्व पर्याय झाल्यानंतर यामधील मोठी संख्या कोणती? विद्यार्थी ६३ सांगेल दिलेल्या उत्तरानुसार लेखनिक संखेच्या समोरील गोल रंगवेल.
· दृश्य अध्ययन शैली अध्ययनार्थी –
- विद्यार्थी स्वतः दिलेल्या गणिताचे निरीक्षण करून मोठी संख्या शोधून त्यासमोरील गोल रंगवेल. मोठी संख्या यासाठी ठळक करावे जेणेकरून विद्यार्थ्यास लहान संख्या व मोठी संख्या यातील भेद समजण्यास सोपे जाईल.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन दिलेल्या पर्यायातील विस्तारित रूप गणितीय स्वरूपातील मांडणी काठीण्य पातळी कमी करावी
- उदा. ३०+६ न ठेवता ५+२ , १ दशक २ एकक किंवा फक्त लहान, मोठी संख्या २,५,६,८ असा बदल करून विद्यार्थ्याकडून मोठी संख्या ओळखून घ्यावी किंवा साहित्याचा वापर करून साहित्य रूपातून लहान संख्या व मोठी संख्या विद्यार्थ्याकडून ओळखून घ्यावे यासाठी वर्गशिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून बदल करावा. बहुपर्याय देऊन गोल करणे किंवा लेखनिक असेल तर विद्यार्थ्याच्या दिलेले उत्तर लेखनिक नोंदवेल.
बहुअध्ययन
शैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा.
· श्रवण शैली अध्ययनार्थी विद्यार्थ्यासाठी अनुकूलन –
- लेखनिकाच्या मदतीने विद्यार्थ्यास प्रश्न वाचून दाखवावा किंवा वर्गशिक्षक स्वतः सहाय्य करेल. उपरोक्त गणितीय मांडणीचे वर्णन ऐकवणे. विद्यार्थी ऐकून एकक स्थानातील अंकाची तोंडी बोटांची भाषेचा वापर करून किंवा आवश्यकता वाटल्यास साहित्याचा वापर करून त्याद्वारे विद्यार्थी बेरीज ही क्रिया करेल व लेखनिक त्याची नोंद करेल.
· दृश्य अध्ययन शैली अध्ययनार्थी –
- विद्यार्थी स्वतः दिलेल्या गणिताचे निरीक्षण करून बेरीज ही क्रिया करेल. विद्यार्थ्यास साहित्य अथवा चित्र आवश्यक वाटल्यास उपलब्द करून द्यावे.
· बहुअध्ययन शैली अध्ययनार्थी क्रमांक १ –
- विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन आवश्यकता वाटल्यास दिलेल्या गणितीय मांडणीतील काठीण्य पातळी कमी करावी
- उदा. दिलेले बेरीज उदाहरण गणित साहित्याचा वापर करून बेरीजेचे उत्तर विद्यार्थ्याकडून काढून घ्यावे. किंवा गणित देताना प्रश्न पत्रिकेत चित्र रुपात गणितीय मांडणी करून गणित सोडवुन घ्यावे. जेणेकरून विद्यार्थी चित्र मोजून गणित सोडवेल.लेखनिक असेल तर विद्यार्थ्याच्या दिलेले उत्तर लेखनिक नोंदवेल.
· बहुअध्ययनशैली अध्ययनार्थी क्रमांक २-
- यामधील विद्यार्थ्यांसाठी जास्त बदल करण्याची आवश्यकता नाही मात्र आवश्यकता असेल तर लेखनिक उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच पेपर लिहण्यासाठी अधिकचा वेळ, कमाल गुणांची सवलत, आकृत्या,नकाशे काढण्याची सवलत, प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा अशा काही सवलती देताना शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ आधार घेण्यात यावा. यासाठी शाळेच्या मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्याच्या गरजेचा विचार करून पालक व वर्गशिक्षक यांच्याशी चर्चा करून अंतीम निर्णय घ्यावा. यासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन व परीक्षेविषयी आवश्यकता असल्यास गटसाधन केंद्रातील (BRC) समावेशित शिक्षण विशेषतज्ञ व रिसोर्स टिचर यांचे मार्गदर्शन घ्यावे.
अशा पद्धतीने इयत्तानिहाय ,विषयनिहाय
विद्यार्थ्यांची अध्ययन शैली ओळखून गरज लक्षात घ्यावी व उपरोक्त पद्धतीने शासन
निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ चा आधार घेऊन प्रश्न पत्रिकेत विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप
अनुकूलन करता येईल.