समावेशीत शिक्षण सातारा अभ्यासदौरा Inclusive Education study tour satara
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆दिवस-दुसरा
भाग-एक
■■■■◆◆◆◆■■■◆◆◆◆◆■■
निसर्गाच्या कुशीत वसलेला सातारा जिल्हा, कुमठे बीटातील शाळा भेट देण्यासाठी बस साताऱ्याहून कुमठे बीटातील शाळेच्या दिशेने निघाली. त्यामध्ये कुमठे केंद्रातील शेळकेवाडी व आसनगाव शाळा बघण्याचे ठरले, सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत वसलेले आसनगाव जिल्हा परिषद शाळा आसनगाव शाळेत आम्ही पोहोचलो.
जिल्हा परिषद शाळा आसनगाव
केंद्र -कुमठे
वर्ग- 1ली ते 7 वी
एकूण पट संख्या- 73
एकूण शिक्षक-4
सण 2013 साली शाळेचा पट 36 होता. आज 2019 मध्ये 73 आहे.
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती प्रात्यक्षिक वर्ग निरीक्षण
बेरजेची झुंज
यामध्ये बेरीज झुंज हा खेळ दोन विद्यार्थ्यांमध्ये घेतला जातो. यासाठी एका तक्त्यावर उभी व आडव्या स्वरूपात अंकाची मांडणी केलेली होती.
खालच्या बाजूला 1 ते 5 अंक (विद्यार्थी स्तरानुसार संख्या वाढते व कमी होते.) उभ्या कॉलम मध्ये एक ते पाच अंकाची बेरीज संख्या असते. विद्यार्थी सोंगाड्या च्या साह्याने अंकावर ठेवून बेरजेची झुंज सुरू झाली.
या खेळात विद्यार्थी विचार करून एक एक घर मिळतात. त्याचप्रमाणे शाब्दिक उदाहरणे देखील तयार करतात. खूपच मनोरंजक खेळातून बेरीज मुले शिकतात.
या दरम्यान आमच्या ग्रुपमधील श्रीखंडे सर आणि जाधव मॅडम यांनी हा खेळ समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष हा खेळ अनुभवला.
या खेळातून मुले आनंदाने बेरीज शिकतात. मुलांचे अवधान टिकून राहते. त्याचबरोबर मुलांचा बौद्धिक विकास होतो.
याच पद्धतीने मुले गुणाकार करायला शिकतात.
यामध्ये श्राव्य अध्ययन शैलीतील विद्यार्थिनी पूजा सहभागी झाली होती. सोंगाड्याच्या मदतीने गुणाकार करून वरील कॉलम मधील संख्या शोधली जाते व एक एक घर काबीज केले जाते. या ठिकाणी पूजा श्राव्य अध्ययन शैली ची विद्यार्थिनी तिची दृष्टीतिक्षणता खूपच कमी असल्याने संख्या शोधण्यासाठी शिक्षक सपोर्ट करतात. उदा. वरच्या ओळीमध्ये संख्या शोध
याप्रमाणे विद्यार्थी खूपच आनंदाने गुणाकार करताना दिसून आली. त्याचप्रमाणे शाब्दिक उदाहरणेदेखील मुले तयार करून सांगतात.
बहु अध्याय शैली (muscular disgraphy) अविकसित मांसपेशी इयत्ता चौथीत शिकणारा तन्मय साठी त्याच्या गरजेनुसार गतीनुसार शैक्षणिक साहित्य बनवले आहेत व गणितीय क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संबोध स्पष्ट केले जातात. तन्मयला उत्तर शोधण्याची वेळ थोडा जास्तीचा वेळ द्यावा लागतो. तन्मय ने आमच्यासमोर गुणाकार व शाब्दिक उदाहरणे खेळाच्या माध्यमातून करून दाखवले.
अपूर्णांकाचा संबोध तसेच इतर गणितीय क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्याज्ञान संबोध स्पष्ट करण्यासाठी स्तरनिहाय तक्ते तयार केलेले आहेत व जोडो ब्लॉग , मनोरंजनात्मक उपक्रम च्या माध्यमातून संबोध स्पष्ट केला जातो. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची गरज स्तर बघून गटागटाने विद्यार्थी खेळातून शिकतात व शिक्षक सुलभकाचे भूमिका बजावतात.
मागे असणाऱ्या मुलांसाठी प्रथम चित्र भाषेचा वापर केला जातो. उदाहरणार्थ दैनंदिन व्यवहारातील पाहिलेल्या वस्ती ची नावे मुळाक्षरे अक्षरा पासून शब्द
चित्र भाषेकडून अक्षर भाषेकडे, अंक भाषेकडे विद्यार्थ्यांना शिकवले जाते.
उदा. म या अक्षरा पासून तयार होणारे चित्र कोणते किंवा मुळाक्षरापासून कोणत्या वस्तूची नावे सांगता येतील अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शोध घेत मुले शिकतात. मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मरण कार्ड दिले जाते. विद्यार्थ्यांच्या खिशात दिवसभर ठेवले जाते. यामुळे विद्यार्थी खिशात ठेवलेले कार्ड वरील अक्षर बघून बघून स्मरणात ठेवते व त्यापासून तयार होणारे चित्राची, वस्तूची नावे याचा शोध घेतात घरी पालकांना विचारतात सरांनी मला म हे अक्षर शिकवले मला सांग आई म पासून कोणते कोणते शब्द तयार होतात. पालक मुलाच्या घरी या पद्धतीने अभ्यास घेतात हाच मुलांसाठी गृहपाठ असतो. गृहपाठावर पालक व शिक्षक यांची सही असते.
स्ट्रोक लेखन पाटी
मुलांचे वाचन कौशल्य विकसित करता करता लेखन कौशल्य देखील विकसित केले जाते. त्यामध्ये स्ट्रोक लेखन पाठी च्या साहाय्याने अक्षरलेखन करायला शिकवले जाते. त्यामध्ये विद्यार्थ्याच्या गरजेनुसार लहान- मोठ्या आकाराची वाटी असते. वाटिला मधोमध छिद्र असते व वाटीत एक बोट छिद्रावर ठेवून बारीक वाळू किंवा रांगोळी टाकून अक्षर काढायला शिकवले जाते. उदाहरणार्थ म हे अक्षर काढण्यासाठी किती स्ट्रोक लागतात? तर 3 स्ट्रोकमध्ये म अक्षर मुले काढतात.
यामुळे मुलांना लेखन करायला आनंद मिळतो. स्ट्रोक समजल्यामुळे हस्ताक्षर सुंदर येते. मुलांच्या स्मरणात राहतील खूपच मनोरंजक उपक्रम ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती मध्ये प्रात्यक्षिक अनुभवला मिळाले.
बहुअध्ययन शैलीने शिकणारा संग्राम ह्या विद्यार्थ्यांची सुरुवातीची स्थिती अशी होती की, लाळ गळणे, वेगवेगळे आवाज काढणे, सु-शी वर कंट्रोल नसणे अशी आव्हाने समोर असताना आसनगाव शाळेतील शिक्षकांनी संग्रामला शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी पालकांच्या मदतीने संग्राम सोबत जवळीक साधली. संग्रामला प्रथमतः शिक्षकांनी आपलेसे केले, संग्राम हा माझा मुलगा आहे. या भावनेतून त्यांनी संग्रामला स्वीकारले. संग्रामला वर्गमंत्री, डबामंत्री बनवले संग्राम दररोज शाळेच्या गेटवर सर्वांच्या आधी येऊन थांबतो व शिक्षक आल्यानंतर डबा घेऊन ऑफिसमध्ये नेऊन ठेवतो यामुळे त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला इतर मुलांसाठी त्याच्याबद्दल कुतुहुल वाटते की सरांनी संग्राम ला डबामंत्री बनवले वर्गमंत्री बनवले
शिक्षक स्वतः त्याला जवळ घेऊन मध्यान्ह भोजन करतात. त्यामुळे बाकीच्या मुलांनी हळूहळू त्याच्याशी मैत्री केली. व आज संग्राम दर रोज शाळेत येऊन अध्ययन करतो.
सु ची वेळ समजण्यासाठी संग्राम ला थोड्या थोड्या वेळानी बाथरूम ला जायला सांगायचे , यावेळी वर्गमित्र त्याच्या सोबत असतात. असे करत त्यांनी त्याची सू ची वेळ समजली, त्याचप्रमाणे लाळ पुसण्यासाठी रुमाल जवळ ठेवला. व लाळ थांबण्यासाठीचे घरघुती आयुर्वेदिक उपाय केले.
संग्राम च्या गर्जेनुरूप व क्षमतेनुसार ज्ञानरचनावादी साहित्य तयार केले. त्यामध्ये चित्राला आकार देणे, जोडो ब्लॉग्स द्वारे ढीग करणे, स्ट्रोक पाटी द्वारे लेखन शिकवले. अक्षराची ओळख यासाठी चित्रभाषेकडून अक्षरे अंकभाषाकडे संग्रामला अध्ययन अनुभव दिला जातो.
शिक्षकांनी संग्रामला दोष आहे. किंवा संग्राम वेगळा आहे हे इतर मुलांना पालकांना जाणवू दिले नाही. त्यामुळे पालकांना संग्राम आणि त्याचे मित्र यांना प्रोत्साहन मिळाले.
वर्गामध्ये भरपूर प्रमाणात ज्ञानरचनावादी घटक निहाय शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे. मनोरंजक उपक्रम राबवले जातात.
शाळेतील सर्व मुले माझे आहे सर्व वर्ग माझे आहेत सर्व विषय माझे आहेत या पद्धतीने शिक्षक वर्ग काम करत आहे. त्यांना वाटेल त्या त्या गटात शिक्षक स्वतःहून मुलांना शिकवतात. त्यामुळे विद्यार्थी अगदी सहज शिकत आहे.
शाळेतील भेटी नंतर लक्षात आले की ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?
➡ विद्यार्थी स्वतः कृती करून शिकतात.
➡वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव विद्यार्थ्यांना मिळतात.
➡ विद्यार्थी आनंददायी पद्धतीने शिक्षण घेतात.
➡ विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने शकतात.
➡सर्व प्रकारच्या अध्ययन शैलीचे विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकत शिक्षक गटागटाने मुलांना सहाय्य करतात.
➡विद्यार्थ्याचे अवधान टिकून राहते.
➡मुलांच्या बेसिक संकल्पना संबोध स्पष्ट होतात. पाया पक्का होतो.
➡ मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लागते.
➡ मुलांचे संभाषण कौशल्य विकसित होते.
➡ विद्यार्थी नवनवीन ज्ञानाची निर्मिती करतात.
➡ जीवन कौशल्याचा विकास होतो.
➡ शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया प्रभावी होते.
➡ मुलांमध्ये शोध घेण्याची वृत्ती वाढीस लागते.
➡ सर्व प्रकारचे विद्यार्थी अगदी सहज शकतात. उदा. आदिवासी, स्थलांतरित, बहुभाषिक विद्यार्थी व अध्ययन शैली चे विद्यार्थी या सर्वांचा एकत्रित विचार ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत केला जातो.
दिवस पहिला समावेशीत शिक्षण सातारा अभ्यास दौरा Inclusive Education study tour satara