समता ते वाचन क्षमता Equity to reading ability

inclusive education


समता ते वाचन क्षमता Equity to reading ability

समता : का? व कशी? Equity: Why? And how?


आम्ही सर्व माणसे आहोत आणि सर्व माणसे समान असतात हे सर्वमान्य सत्य आहे. जगातील प्रत्येक
माणसाला आनंद हवाच असतो. आनंदाबरोबरच प्रत्येक माणसाला आत्मसन्मान, समाधान, प्रेम, विश्वास हे
हवेच असते हे ही सत्य आहे.

माणसाला आत्मसन्मान, आनंद इ. किती हवा असतो असे विचारल्यास “जेवढे मिळाले तेवढे कमीच” असे
त्याचे उत्तर असते. तसेच या पाचही बाबींचे मोजमाप करता येत नाही. त्यामुळे माणसांच्या या गरजा सर्व
माणसांमध्ये समान आहेत असे म्हणता येईल. याचाच अर्थ या गरजांच्या बाबतीत सर्व माणसे समान आहेत.


यालाच राज्यघटनेत समानता असे संबोधण्यात आले आहे.


प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, झोप, पाणी हे सुद्धा हवे असते. परंतु या गरजा “मिळाल्या तेवढ्या
कमीच” असे नसते. या गरजा मोजता येतात आणि त्याचे प्रमाण आणि प्रकार प्रत्येक माणसासाठी वेगवेगळे असू शकते. त्यामुळे या गरजांच्या पातळीवर सर्व माणसे समान नसतात.

आम्ही उपयोगी माणसे आहोत :

प्रत्येक माणसाची क्षमता सारखीच (समान) असते. माणसे योग्यतेच्या पातळीवर वेगळी दिसतात. माणूस
स्वतःची योग्यता विकसित करतो. माणूस ज्या बाबीकडे लक्ष देतो त्या बाबीमध्ये त्याची योग्यता वाढते.
माणसाची योग्यता ही लक्ष देण्यावर अवलंबून असते आणि योग्यतेप्रमाणे पात्रता निश्‍चित होते. पात्रतेप्रमाणे त्यांना पद/फळे मिळतात. व्यक्तीस जेवढे फळ मिळेल तेवढीच त्याची यशस्विता. यश हे प्रत्येक माणसाला हवे असते.
आयुष्यात मिळणाऱ्या यशाच्या एकत्रीकरणातून माणूस स्वतःची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील
असतो. उपयोगिता सिद्ध झाली की माणूस आंनदी होतो. प्रत्येक माणसाला हा निरंतर आनंद हवाच असतो.
या पातळीवर माणसे समान असतात.

उपयोगिता सिद्ध झाल्याने आनंद मिळतो 

पाण्याचे मूल्य (किंमत नव्हे) तहान भागवणे हे आहे, अन्नाचे मूल्य भूक भागवणे हे आहे तसे माणसाचे मूल्य
स्वतःची उपयोगिता सिद्ध करणे आहे. स्वतःची मूल्यप्राप्ती करण्याच्या आनंदापेक्षा मोठा आनंद माणसाच्या
जीवनात शक्‍य नाही. स्वतःचे मूल्य प्राप्त करणे हे माणसाचे लक्ष्य (उद्दिष्ट) आहे. त्यासाठी तो आयुष्यभर
झटत राहतो. मात्र या बाबींकडे आजच्या माणसाचे लक्ष तेवढे स्पष्टपणे गेलेले नाही.

शिक्षणाने प्रत्येक माणसामध्ये ही स्पष्टता येणे आवश्यक आहे. शिक्षणातून हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास प्रत्येक
माणूस आजच्यापेक्षा अधिक समाधानी आणि आनंदी होईल. समाधान आणि आनंद प्रत्येक माणसाला हवाच

असतो. ज्या दिशेने लक्ष दिल्याने अधिकाधिक आनंद मिळेल त्या दिशेकडे माणसाचे लक्ष जाईल. उपयोगिता
मूल्य सिद्ध करण्याने परम आनंद मिळतो हे कळल्यावर त्याकडे सर्व माणसे लक्ष देतील.

माझा आनंद माझ्या वर्गातील प्रत्येक मूल शिकण्यात 

वर्गातील प्रत्येक मूल शिकले तर शिक्षक यशस्वी झाला. त्याचे शिक्षक उपयोगिता मूल्य सिद्ध झाले. जोपर्यंत
वर्गातील १००% मुले शिकत नाहीत शिक्षकाचे उपयोगिता मूल्य सिद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षक समाधानी किंवा
आनंदी होत नाही. प्रत्येकाला समाधान किंवा आनंद हवाच असतो. हवा असताना सुद्धा त्याला तो मिळत नाही
तो तोट्यात राहतो. सेवानिवृत्तीपर्यंत केव्हाही वर्गातील १००% मुले शिकली नाहीत तर शिक्षक म्हणून त्याचे
उपयोगिता मूल्य सिद्ध झाले नाही. आयुष्य संपून गेले पण उपयोगिता सिद्‌ध झाली नाही म्हणून आयुष्यात
खरा आनंद मिळाला नाही असे आपल्या बाबतीत होत नाहीना याचा विचार करायला हवा. सेवानिवृत्ती अगोदर
१००% मुलांना शिकविता आल्यास अजूनही आपण आपली उपयोगिता सिद्ध करून आपला हक्काचा आनंद
प्राप्त करू शकतो.

माझ्या आनंदासाठी :

आपण सर्वजण माणसे आहोत त्याचप्रमाणे शिक्षकही आहोत. आपला आनंद आपली मुले शिकण्यात आहे.
असा एकही शिक्षक आपल्यामध्ये नाही ज्याला आपली मुले नाही शिकली तर आनंद होतो म्हणून माझ्या
स्वतःच्या आनंदासाठी माझ्या वर्गातील सर्व मुले शिकावीत यासाठी आपण प्रयत्न करीत असता.

प्रत्येक मूल शिकू शकते 

प्रत्येक शिक्षक शिकवू शकतो. प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची क्षमता असते तशी प्रत्येक शिक्षकामध्ये
शिकवण्याची क्षमता असते. आपण सगळेजण आपल्या वर्गातील सर्व मुलांना मनापासून शिकवितो. पण काही
मुले शिकत नाहीत.
प्रत्येक मूल माणूस आहे. माणसाप्रमाणे त्याच्याही आनंद, आत्मविश्वास, प्रेम, समाधान आणि यश या
प्रत्येक मुलाच्या गरजा आहेत. यातील एक जरी गरज पूर्ण नाही झाली तरी मूल शाळेत रमत नाही, शिकत नाही
म्हणून टिकत नाही. हेच आपल्या दुःखाचे कारण होते.
मुलाला शिकण्यातून आनंद, आत्मविश्‍वास आणि यश मिळत नाही याचे एक महत्त्वाचे कारण शिकण्याचे
स्वतः पलीकडचे जग समजून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असलेले “वाचन” त्याला येत नाही. त्याला वाचता
आले तर ते शिकते होईल. वाचन शिकण्याची ही प्रक्रिया मुलासाठी आनंद, आत्मविश्वास, प्रेम, समाधान आणि
यश देणारी असेल तर प्रत्येक मूल वाचायला शिकेल आणि आपणही आनंदी होऊ!


संदर्भ- मूलभूत वाचन क्षमता शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका



समता : का? व कशी? Equity: Why? And how?

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now