ऋषिकेश माळी या सेरेब्रल पालसी विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

inclusive education cp student

ऋषिकेश माळी या सेरेब्रल पालसी विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश

ऋषिकेश माळी या सेरेब्रल पालसी विद्यार्थ्यांने 86% गुण मिळवत यश प्राप्त केले. Rishikesh Mali, a cerebral palsy student, achieved success in the 10th examination


"असाध्य ते साध्य करीता सायास'..या उक्ती स अनुसरून ज्या मुलास लहान पणी बोलता येत नव्हते,हात पायात पीळ होता डोळे तिरळे होते,,बसता येण्याची सुतराम शक्यता नव्हती.. अशी बहुविकलांग पणाची लक्षणे असलेल्या "सेरेब्रल पाल्सी' या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या " न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा' ता. म्हसळा जि.रायगड या शाळेतील कुमार ऋषिकेश शितल सुदाम माळी या विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2019 या परिक्षेत...सेमी इंग्रजी माध्यमात.(.500 पैकी .433....इतके गुण ) ...86.60टक्के .गुण मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले.

 विविध समस्यांमुळे कु.ऋषिकेश अधून मधून च शाळेत जात असे.तसेच त्याला पूर्ण वेळ शाळा कधीच करता आली नाही.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील शाळेतील शिक्षक व प्राचार्य श्री बी.एन. माळी यांना दिले. तसेच शाळेचे चेअरमन श्री समीरजी बनकर यांनी त्याला वेळोवेळी केलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याबद्दल कु ऋषिकेश ने  त्यांचेविशेष आभार मानले.

  ९ वी परीक्षेनंतर १०वी पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन ,लोकसत्ता मधील "यशस्वी भव' या सदरा चा नियमित अभ्यासात वापर ,विविध यु ट्युब चँनेल वरील मार्गदर्शन, तसेच पाष्टी शाळेतील सर्व शिक्षकांचे घरी मिळणारे मार्गदर्शन व शेवटी बाल भारती व नवनीत च्या प्रश्नपत्रिकांचा सोडवून सराव....या मुळे परीक्षेत यश मिळवणे सोपे झाल्याचे त्यने सांगितले.

त्याचबरोबर  पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून समावेशित शिक्षण अंतर्गत सहाय्य्यभुत सेवा व वेळोवेळी मिळणारे अभ्यासाचे मार्गदर्शन याबद्दल समावेशित शिक्षण साधनव्यक्ती, विशेष शिक्षक व संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचे मिळणारे प्रोत्साहन व मार्गदर्शन मला कामी  आले असे यावेळी ऋषिकेशने सांगितले.

अभ्यासाबरोबरच आई बाबांनी माझा व्यायाम, फिजिओथेरेपी,योगासने,आहार व आरोग्य याची  काळजी,सायकलींग व नियमित चालणे,गायन..ईत्यादी बाबींवर कटाक्षाने मेहनत घेतल्याचे कु.ऋषिकेश याने आवर्जून सांगितले.

इयत्ता १० वी अभ्यासक्रमातील अरूणिमा सिन्हा , वैज्ञानीक स्टिफन हँकिंग , O God forgive me  या पाठ्यांशांनी माझ्या जीवनावर प्रभाव टाकल्याचे त्याने सांगितले. तसेच विज्ञानातील "स्टेम -सेल'थेरेपी या आधुनिक ऊपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतावर अनुभव घेतला.उपचारानंतर मार्च महिन्यात थेरेपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखीने त्रस्त असताना सुद्धा  या सगळयांशी झुंजत मंजूर असलेल्या लेखनिकास "बँक बेंचवर ' बसवून स्वतः हाताने पेपर लिहून सर्व प्रश्न व उत्तराचे मुद्दे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत यशाचे शिखर गाठले.


"सेरेब्रल पाल्सी' म्हणजे मेंदूचा पक्षाघात ..जन्मभर साथ देणार्या आजारावर मात करून ऋषिकेश ने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल..न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे सर्व शिक्षक व प्राचार्य व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य श्री बी.एन् .माळी शाळेचे चेअरमन श्री समीरजी बनकर म्हसळा तालुका गटशिक्षणाअधिकारी श्री संतोष  शेंडगे साहेब विस्तार अधिकारी श्री गजानन साळुंखे साहेब, सर्व BRC समावेशीत शिक्षण टीम त्याचबरोबर पी.एन्.पी.सोसायटी अलिबाग च्या कार्यवाह सौ. चित्रलेखा पाटील मँडम, दिव्यांग -अपंग संघटनेचे  राज्य अध्यक्ष..श्री साईनाथ पवार,रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघटने चे अध्यक्ष श्री रामदास पाडगे व श्री अ. पां म्हात्रे,म्हसळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक ,केंद्रप्रमुख,विविध अधिकारी ,पदाधिकारी.पत्रकार श्री उदय कळस,श्री अशोक काते ...बाळशेठ करडे, रमेश शेठ जैन ,मुकेश शेठ जैन,प्रविण बनकर,पाष्टी चे माजी सरपंच श्रीपतशेठ मनवे व राजाराम धुमाळ,जे.जे.स्कूल आँफ आर्टस चे प्रकाश पाटील सर तसेच कु. ऋषिकेश चे स्विमींग चे प्रशिक्षक व सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक श्री हरी अर्जून सोनकांबळे सर, स्वयंम फाऊंडेशन च्या विद्या पाटील मँडम , डाँ. तेजस्वीनी कदम ,प्रतिभा वाघ मँडम यांनी  व सर्व हितचिंतकांनी व आप्तस्वकियांनी ऋषिकेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे व पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.*
 भविष्यात परीक्षा देऊन ऋषिकेश ला  अधिकारी बनवून दिव्यांग व खासकरून सेरेब्रल पाल्सी ग्रस्त पाल्य व पालक यांचे  मनोबल उंचावण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी काम करणार असल्याचे त्याची आई शितल माळी यांनी सांगितले.

सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्याच्या जिद्दीला सलाम
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now