विशेष गरजा असणाऱ्या (cwsn दिव्यांग) मुलांच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या?प्रश्नपत्रिका कशा काढायच्या?
शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ नुसार विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देणे बाबत...
तुमच्या वर्गात दिव्यांग मूल आहे. तुम्हाला चाचणी घेताना अडचणी येत आहे. नक्की प्रश्नपत्रिका कशा काढायच्या समजत नाहीये. चला तर मग समजून घेऊया.....
प्रथम cwsn विशेष गरजा असणारे मूल समजून घेताना.
दरवर्षी आपण UDISE फॉर्म भरतो त्यामध्ये cwsn मुलांची नोंद केली जाते. मात्र इथे आपण लक्षात घेऊया प्रत्येक अपंगत्वानुसार मुलांची क्षमता वेगवेगळी आहे. आणि प्रत्येक मुलाला 40% अपंगत्व प्रमाणपत्र मिळेलच असे नाही.
मग ज्यांना प्रमाणपत्र नाही त्यांना cwsn कसे ग्राह्य धरणार?
आपला प्रश्न बरोबर आहे. परंतु आपण थोडं खालील उदा. द्वारे समजून घेऊया
उदा. अस्थिव्यंग विद्यार्थी आहे. तो दिव्यांग कॅटेगरी मध्ये मोडतो. त्या मुलास त्याच्या गरजेप्रमाणे साहित्य साधन , वैद्यकीय सेवा पुरवल्यास त्या विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा व शिक्षण घेण्याची समस्या सुटते. कॅलिपर, कुबड्या, तीनचाकी सायकल त्याच्या गर्जेनुरूप साहित्य देऊन तो नॉर्मल मुलाप्रमाणे शिक्षण घेतो. त्यामुळे त्यासाठी प्रश्न पत्रिकेत बदल करण्याची आवश्यकता नाही. प्रमाणपत्र जरी 40% चे नसेल तरीसुद्धा वरील सेवेचा लाभ घेण्यासाठी व IED मार्फत राबविणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी UDISE मध्ये नोंद असणे आवश्यक आहे.
इथे मी ठळक गोष्टी नमूद करत आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या क्षमता व गरजेनुसार support द्यावा लागेल. हे आधी लक्षात घ्यावे.
अंशतः अंध मुलास चष्मा, डोम, लार्ज प्रिंट देऊन,
अंध मुलास अंध काठी, ऑडिओ किट लेखनिक देऊन. वाचादोष विद्यार्थी स्पीच थेरेपी ,
अध्ययन अक्षम मुलांची समस्या ही लेखन, वाचन, गणित थोड्या प्रमाणात दोष असतात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत बदल करण्याची आवश्यकता नाही.
शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ नुसार
विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देणे बाबत...
◆मुख्य उद्देश◆
विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मूल्यमापन व परीक्षा पद्धतीमध्ये काही सोयी सवलती देऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत आणणे हा सोयी-सवलती देण्यामागील मुख्य उद्देश आहे.
कोणत्या अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकेत अंशतः किंवा पूर्णतः बदल करता येईल?
१६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार मतिमंद ,कर्णबधिर ,बहुविकलांग, सेरेब्रल पालसी, आणि स्वमग्न मुलांच्या साठी प्रश्नपत्रिकेत बदल करता येईल. (प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नसल्यास काढून घ्यावे.)
प्रश्नपत्रिका कशा काढायच्या?
वरील अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका काढत असताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार व गरजेनुसार प्रश्नपत्रिकेत वर्गशिक्षक स्वतः प्रश्नपत्रिका विकसित करून या मुलांची परीक्षा घेण्यात येईल. या साठी वर्गशिक्षक विशेष शिक्षक, समावेशित शिक्षण तज्ञ यांची मदत घेतील.
प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार हवा तसा बदल करण्याचा अधिकार हा वर्गशिक्षकांना असेल मात्र प्रश्न संचाचे अनुकूलन म्हणजे अगदी सोपे प्रश्न विचारणे हा उद्देश नसून इयत्ता व विषयांनुसार संकल्पनांचा विकास होण्यासाठी आव्हानात्मक प्रश्नांची निर्मिती करणे हा आहे. या बाबीचा विचार करूनच वर्गशिक्षकांनी प्रश्नपत्रिका विकसित करून नॉर्मल विद्यार्थ्यांच्या सोबतच या मुलांची परीक्षा घेण्यात यावी.
यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न जसे की रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, गटातील वेगळा शब्द ओळखा, जोडाक्षर युक्त शब्दलेखन एका वाक्यात उत्तरे द्या अशा प्रश्नांचे स्वरूप असेल जेणेकरून विद्यार्थी सहजतेने प्रश्नपत्रिका सोडवू शकेल.
अंशतः अंध, अंध, वाचादोष ,अध्ययन अक्षम या मुलांच्या साठी प्रश्नपत्रिकेत बदल करता येणार नाही. मात्र यासाठी मुलांना सवलती देण्यात येतील.(प्रमाणपत्र नसेल तरीसुद्धा सवलत घेता येईल.)
■काही एकत्रित ठळक मुद्दे■
◆ 20 मिनिटांचा अधिक वेळ
◆ 20 गुणांची सवलत आकृत्या नकाशे काढण्यामध्ये सवलत
◆स्पेलिंग व्याकरण विरामचिन्हे चुकांबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये
◆गणितीय शब्द रचना सरळ व सोपी असावी ◆चित्र आकृत्या नकाशे ऐवजी प्रश्न असावेत वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी सुस्पष्ट सूचना देण्यात याव्यात
◆आवश्यकता असल्यास लेखनिक पुरवला जावा
विशेष नोंद
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवर सुविधा देण्यात याव्यात या सुविधा देताना संबंधित पालक व शिक्षक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार मुख्याध्यापकांनी सवलती देण्याचा निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पूरक ठरणाऱ्या सवलती देणे बंधनकारक राहील.●लेखनिक●
इयत्ता पहिली ते नववीपर्यंत आवश्यकतेप्रमाणे लेखनिक घेण्यास मुभा द्यावी . पहिली ते नववीपर्यंत लेखनिक हा मागील इयत्तेचा त्याचा असावा.
ज्या विद्यार्थ्यास सोयी-सवलती द्यावयाची आहे त्या विद्यार्थ्यांच्या अपंगत्वानूसार 8 जाने 2016 शासन निर्णयाचे वाचन करून त्या guidelines नुसार सवलत देण्यात यावी. क्लीक करा 👇
> १६ ऑक्टोबर २०१८ शासन निर्णय इ. 1 ली ते 12 वी परीक्षा सोयी सवलती
> दिव्यांग विद्यार्थी परीक्षा सवलती शासन निर्णय
दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याबाबत सूचना GR शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक १५ फेब्रुवारी २०१६